(क्रीडा घडामोडी / राष्ट्रकुल स्पर्धा) पॅराऑलिंपिक २०२६
दिलीप महादू गावित : प्रेरणादायी सुवर्ण कामगिरी
१. वैयक्तिक माहिती व पार्श्वभूमी
- पूर्ण नाव : दिलीप महादू गावित.
- मूळ गाव : तोरणडोंगरी, जि. नाशिक (महाराष्ट्र).
- कौटुंबिक पार्श्वभूमी : गरीब शेतकरी कुटुंब.
- संघर्ष : वयाच्या सहाव्या वर्षी झाडावरून पडल्याने झालेल्या दुखापतीवर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे 'गँग्रीन' झाले आणि त्याचा उजवा हात कोपराखाली कापावा लागला.
२. क्रीडा प्रकार व स्पर्धा
- स्पर्धा : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो (Commonwealth Games).
- क्रीडा प्रकार : पॅरा ॲथलेटिक्स – पुरुषांची १०० मीटर धावणे, टी४७ (T47) प्रकार.
- 'टी४७' वर्गवारी म्हणजे काय : एका हाताचे अपंगत्व किंवा अडचण असलेल्या धावपटूंची श्रेणी, ज्यामुळे शरीराचा तोल, ताकद किंवा समन्वयावर परिणाम होतो.
३. प्रमुख यश व विक्रम
- पदक : सुवर्णपदक (Gold Medal).
- वेळ व विक्रम : १०.७१ सेकंद ही वेळ नोंदवून स्पर्धेतील नवीन विक्रम (Games Record) प्रस्थापित केला आणि मोसमातील स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
४. प्रशिक्षक व वाटचाल
- प्रशिक्षक : वैजयंथ काळे.
- सुरुवातीची वाटचाल : गावात सुविधा नसताना प्रशिक्षक काळे यांनी शाळेतच दिलीपमधील गुणवत्ता ओळखली व पालकांची समजूत काढून त्याला धावण्याचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीला पॅरा स्पर्धांची माहिती नसल्याने तो सामान्य खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन उत्तम कामगिरी करायचा.
६. ऐतिहासिक दुहेरी यश
- स्पर्धा : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (ग्लासगो).
- खेळ व प्रकार : पॅरा गोळाफेक (Shot Put) – एफ-५७ (F-57) प्रकार.
- ऐतिहासिक विक्रम : या प्रकारात भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले असून एकाच वेळी भारताने सुवर्ण आणि रौप्यपदक (दुहेरी यश) पटकावण्याची कामगिरीही पहिल्यांदाच केली.
७. पदकविजेते खेळाडू व त्यांची कामगिरी
अ) सोमन राणा (सुवर्णपदक - Gold Medal)
- कामगिरी : १३.४० मीटर अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदक पटकावले.
-
पार्श्वभूमी :
- भारतीय लष्करात जवान (गोरखा रायफल्स - शिपाई).
- २००६ मध्ये पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात उजवा पाय गमावला.
- बॉक्सिंगपासून सुरुवात (राष्ट्रीय स्तरावर सलग ५ वर्षे मिडलवेट बॉक्सर).
- २०१७ मध्ये लष्कराच्या पॅरालिम्पिक नोडमधून पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुरुवात.
- मागील यश : २०२२ च्या हांगझो आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक.
ब) शुभम जुयाल (रौप्यपदक - Silver Medal)
- कामगिरी : १३.२८ मीटर सर्वोत्तम फेक करून रौप्यपदक पटकावले.
-
पार्श्वभूमी :
- भारतीय लष्करात जवान (आर्मी कॅडेट कॉलेज प्रवेश परीक्षेची एसएसबी मुलाखतीला जाताना भीषण अपघात होऊन पाय गमावला).
- मागील यश : भुवनेश्वर राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६ मध्ये रौप्यपदक, तसेच भारतीय पॅरा ॲथलेटिक्स ग्रॉंप्री २०२६ मध्ये सुवर्णपदक.